शहरात विकासकामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे भाग्य मिळाले

0
19

आगरकर मळा गजानन कॉलनी येथील ओपन स्पेस सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा

नगर – शहर विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करता आला. त्यातून शहरातील मूलभूत सुविधांसह प्रभागातील महत्वाची कामे मार्गी लावता आली याचे समाधान आहे. गेल्या अनेक वषारपासून ही जागा वापरण्याजोगे नव्हती. येथील महिला, बालके, जेष्ठ नागरिकांना विरुंगळासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती. जेष्ठ नागरिक मंचचे के. डी. खानदेशे व जेष्ठ नागरिकांनी पाठपुरावा केल्याने ओपन स्पेस सुशोभीकरण कामानंतर येथे परिसरातील महिलांना, बालकांना तसेच जेष्ठ नागरिकांना येथे आपला थोडा वेळ घालवता येईल. आगरकर मळा परिसर शहराचे मोठे उपनगर असून या उपनगरातील नागरिकांच्या दळणवळणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काटवण खंडोबा रस्त्यासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून खोकर ओढ्यावरील पुलाचे काम सुरु झाले असून लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होईल या माध्यमातून स्टेशन परिसराच्या विकासाला गती प्राप्त होईल असे सांगत शहरात विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे भा१/२य मिळाले, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. नगर शहरातील स्टेशन रोड परिसरातील गजानन कॉलनी येथील ओपन स्पेस जागेचा सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला.

यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, जेष्ठ नागरिक मंचचे के. डी. खानदेशे, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, प्रा. माणिकराव विधाते, संभाजी पवार, सुहास मुळे, दत्ता खैरे, निलेश बांगरे, कुलांगे काका यांच्यासह निरज लुणिया, रूपल लुणिया, श्रद्धा लुनिया, रंजना लुणिया, कोमल लुणिया, अक्षय गांधी, अरुणा गांधी, प्रियंका गांधी, हर्षद कटारिया, मयुरी कटारिया, सुनील बोगावत, सुजाता बोगावत, प्रभा खंडेलवाल, संदीप कुलांगे, राजश्री कुलांगे, रोहिणी आढे, वेदांत आढे, सुहास गोरे, सोनाली गोरे, गौतम मैशेरी, गीता मैशेरी, मनीष शेट्टीया, अ‍ॅड.संजय वाल्हेकर, अ‍ॅड.योगेश मंडोत, सुचिता मंडोत, अर्चना वालेकर, साक्षी वालेकर, मनोज मेहेर, जामगावकर काका, राजेश जोशी, डॉ. मीनल जोशी, वैशाली मुथा सोनाली गर्जे, प्रसाद सैंदाणे, पल्लवी सैंदाणे, सुवर्णा डांगे, सृष्टी डांगे, रितू रोहाल आदी उपस्थित होते. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, गेल्या २५ ते ३० वषारचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न आ. संग्राम जगताप यांनी केला आहे. आज नगर शहर बदलतंय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महानगरपालिकेचे अद्याप एक रु१/२णालय झाले नाही ते काम करण्याचे भा१/२य आ. संग्राम जगताप यांच्यामुळे मला लाभले.

आज महानगरपालिकेचे स्वत… चे ५ मजली रु१/२णालय उभे राहत आहे. या रु१/२णालयात सामान्य रु१/२णांना अत्यंत अल्पदरात उपचार घेता येणार आहे. आ. जगताप यांच्या माध्यमातून शहरात अनेक विकास कामे मार्गी लागले असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आगामी काळात नगर शहर पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर ओळखले जाईल. यावेळी संभाजी पवार म्हणाले, स्टेशन उपनगराच्या विकासासाठी आ. संग्राम जगताप यांचे मोठे योगदान असून त्यांनी विविध मूलभूत प्रश्नांबरोबर इतरही भरीव कामे करण्याचे काम केले आहे. शहरात महापालिकेचे रु१/२णालयसाठी राज्य सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील पाहिले म्युझिकल फाऊंटन बसविण्याचे काम केले. यानंतर शहरातील महत्वाचे रस्ते काँक्रीटीकरण करण्याचे काम आ. जगताप यांनी केले आहे. आजच्या ओपन स्पेस सुशोभीकरण कामात देखील त्यांचे मोठे योगदान असून कामाच्या दर्जे बाबतीत देखील ते वारंवार अहवाल घेत असतात त्यामुळे कामाच्या ठेकेदारांकडून देखील काम दर्जेदार पद्धतीने केले जाते.

कोरोना काळात आमची कोणीही विचारपूस केली नाही : के. डी. खानदेशे

कोरोनाच्या काळात संपूर्ण जग घरात बंद असताना सामान्यांचे हाल विचारण्यासाठी साधे येथील कोणीही नगरसेवक आले नाही. याकाळात इतर प्रभागातील नगरसेवक आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांचे आरो१/२याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु आमचे नगरसेवक याकाळात साधे आमच्याकडे फिरकले देखील नाही. आमच्या आरो१/२याची विचारपूस देखील केली नाही. त्या काळात आम्हाला पोरकेपणाची भावना निर्माण झाली होती, असे मत जेष्ठ नागरिक मंचचे के. डी. खानदेशे यांनी व्ये केले.