टपरी चालवायची असेल तर आठवड्याला २ हजार रुपये दे अन्यथा जिवे ठार मारणार

0
51

नगर – पान टपरी चालविण्यासाठी टपरी चालकाला एकाने खंडणी मागत शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना नगर शहरातील मार्केट यार्ड समोरील चौकात बुधवारी (दि.७)दुपारी घडली. खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याबाबत टपरी चालक जगदीश झुंबर काळोखे (रा. त्रिमूर्ती चौक, सारसनगर) यांनी गुरुवारी (दि.८) रात्री कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळोखे यांची मार्केट यार्ड चौकात पान टपरी असून आरोपी टिं१/२या उर्फ गणेश पोटे हा बुधवारी (दि.७) दुपारी ३.३० च्या सुमारास टपरी जवळ आला आणि काळोखे यांना म्हणाला की तु दिवसाला १ हजार रुपये कमवतो, त्यामुळे आठवडा भराचे ७ हजार होतात. त्यातील २ हजार दर आठवड्याला मला दे नाहीतर तुला जीवे ठार मारील असे म्हणत त्याने काळोखे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. याबाबत काळोखे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी टिं१/२या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३८५, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पो. ना. वर्षा पंडित या करत आहेत.