कोतवाली पोलिस स्टेशन येथे पोलिसाची तक्रारदारास मारहाण

0
47

नगर – महाराष्ट नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष असलेले किरण प्रशांत रोकडे याचा मित्र सनी भुजबळ यास काही तरुणांनी ८ फेब्रुवारी रोजी मारहाण केल्यामुळे मी त्यांच्या सोबत कायदेशीर तक्रार देण्यासाठी कोतवाली पोलिस स्टेशन येथे गेलो होतो त्या वेळेस पोलिस निरीक्षक दराडे यांना जाऊन भेटलो असता आम्हाला कायदेशीर तक्रार द्यायची आहे असे सांगितले. त्यांनी आम्हाला सांगितले कि तुम्ही १० मिनिटे बाहेर जाऊन बसा. नंतर तुम्हास बोलवतो व तुमची तक्रार नोंदून घेतो. त्यामुळे मी व माझा मित्र पोलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या झाडाखाली उभे राहिलो होतो. त्यानंतर पाच मिनिटांनी सिव्हिल ड ्रेस परिधान केलेला तानाजी पवार हा पोलिस कर्मचारी तेथे आला व त्याने मला किरण रोकडे तूच का असे विचारले असता मला सवारच्या समोर शिवीगाळ करत काही कारण नसताना मला लाथाबुयांनी मारहाण केली.

तू इथून लगेच निघून जा परत जर इथे दिसलास तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकून तानाजी काय आहे हे तुला दाखवील. कर्मचारी तानाजी पवार याने कायदा हातात घेऊन मला मारहाण केली असून कोतवाली पोलिस स्टेशन आवारातील सी सी टीव्ही फुटेज तपासून सदरील कर्मचार्‍यावर कठोर कारवाई करून त्यास सेवेतून निलंबित करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन मनसेच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे विभाग प्रमुख किरण रोकडे, शहरजिल्हाध्यक्ष गजेंद्र राशीनकर, शहर सचिव संतोष साळवे, संकेत व्यवहारे, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.