नगर – किराणा दुकानाच्या गल्ल्यात असलेली ४ हजार ५०० रुपयांची रोकड एकाने बळजबरीने पळवून
नेल्याची घटना नगर तालुयातील देहरे गावात बुधवारी (दि.७) सकाळी ९ च्या सुमारास घडली. याबाबत
दुकानदार सुभाष झुंबरलाल सुरपुरिया (रा. देहरे, ता.नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली
आहे. सुरपुरिया यांचे देहरे गावात ग्रामपंचायत कार्यालया शेजारी किराणा दुकान आहे. बुधवारी सकाळी ९
च्या सुमारास ते दुकानात असताना आरोपी शिवाजी तुकाराम जाधव (रा. देहरे, ता.नगर) हा तेथे आला व
त्याने दुकानातील गल्ल्यातून बळजबरीने ४ हजार ५०० रुपयांची रोकड पळवून नेली असल्याचे या फिर्यादीत
म्हंटले आहे. पोलिसांनी संशयित आरोपी शिवाजी जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.