न्यायालयाच्या आवारातून दुचाकीची चोरी

0
34

नगर – जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या झाडाखाली उभी केलेली होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र.एम. एच.१६ सी के ५७४६) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत मीना नामदेव होले (रा.मराठी शाळेजवळ, भूतकरवाडी) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.७) फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.