व्यापाऱ्यांनी नगर बाजार समितीत परवाना नूतनीकरण करून घ्यावे

0
67

नगर – नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नोंदणीकृत व्यापार्‍यांना त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाजार समिती प्रशासनाने याबाबत निर्देश जारी केले आहेत. १ फेब्रुवारीपासून सदर नूतनीकरण प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार मार्केटयार्ड, बाजार समिती आवार, दाळमंडई, आडतेबाजार येथील व्यापार्‍यांनी आपले परवाने नूतनीकरण करावे. यासाठी बाजार समिती कार्यालयात नूतनीकरणाचे फॉर्म भरायचे असून सोबत पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्डची झेरॉस तसेच विहित वार्षिक फी जमा करावी, असे आवाहन राजेंद्र चोपडा यांनी केले आहे. राजेंद्र चोपडा यांनी म्हटले आहे की, बाजार समितीत नोंदणी असलेल्या व्यापार्‍यांना परवाना नूतनीकरण आवश्यक आहे. विहित मुदतीत नूतनीकरण न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे व्यापार्‍यांनी निर्धारित वेळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून परवाना नूतनीकरण करून घ्यावे.