सबज्युनिअर स्पर्धेतून भविष्यातील खेळाडू घडतील : अभय आगरकर

0
51

नगर – अहमदनगर जिल्हा क्रीडा क्षेत्रात भरीव प्रगती करत असून, सबज्युनिअर स्पर्धेतून भविष्यातील खेळाडू घडतील. लहान वयात खेळाची आवड निर्माण होणे अत्यावश्यक झाले असून, त्यासाठी अशा क्रीडा स्पर्धा गरजेच्या असल्याचे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केले. वाडियापार्क क्रीडा संकुल येथे अहमदनगर जिल्हा अ‍ॅथलेटीस असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उद२घाटनाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात आगरकर बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हॉकीचे राष्ट ्रीय खेळाडू उपजिल्हाधिकारी गणेश राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, छत्रपती पुरस्कार विजेते सुनील जाधव, माधव साबळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, भाऊराव वीर, अ‍ॅथलेटिस असोसिएशनचे सचिव दिनेश भालेराव, क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्ष राजेंद्र कोतकर, व्हॉलीबॉल राज्य संघटनेचे उपाध्यक्ष शैलेश गवळी, महाराष्ट ्र राज्य सायकलिंग असोसिएशनचे सचिव संजय साठे, कल्पेश भागवत, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, रोटरी लब ऑफ डिि३/४टीचे अध्यक्ष प्रसन्ना देवच क्के, सचिव उज्ज्वला राजे, अभय राजे, अनिल बिहानी, शशी बिहानी, डॉ. प्रदीप चोभे, डॉ. अजिता चोभे, डॉ. अमृता देवच क्के, हर्षद मुळे, श्वेता मुळे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये सबज्युनिअर स्पर्धा उत्साहात, खेळाडूंसह ज्येष्ठांचा सहभाग

उपजिल्हाधिकारी गणेश राठोड म्हणाले की, खेळात प्रशिक्षक हे अत्यंत महत्त्वाचे असून, यो१/२य वेळी यो१/२य दिशा प्राप्त केल्याने खेळात नैपुण्य प्राप्त करता येते. लहान वयासाठी असणार्‍या सब ज्युनिअर स्पर्धा न क्कीच भविष्यातील आंतरराष्ट ्रीय खेळाडू निर्माण करतील. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी भविष्यातील उपलब्ध होणार्‍या क्रीडा सुविधांबाबत माहिती देताना सिंथेटीक ट ्रॅकचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याची १/२वाही दिली. छत्रपती पुरस्कार विजेते सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनेक राष्ट ्रीय खेळाडू घडविणारे माधव साबळे यांना जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व राष्ट ्रीय पदकविजेती खेळाडू साक्षी भंडारी हिला जिल्हास्तरीय गुणवंत खेळाडू पुरस्कार देऊन गौरव केला. या स्पर्धेत ६, ८, १०, १२ व १४ वर्ष तसेच ३५ ते ७० वयोगटातील जेष्ठ खेळाडूंनी उत्साहात स्पर्धेत सहभाग नोंदवला. ८, १०, १२ वयोगटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. पंच म्हणून संदीप घावटे, राहुल काळे, श्रीरामसेतू आवारी, जगन गवादे, रावसाहेब मोरकर, सुयोग शेळके, भरत थोरात, अमित चौहान, गुलजार शेख, नेहा मोरे, विश्वेशा मिस्किन, अनिकेत कोळगे, यशवंत पानमळकर, ओमकार दहिफळे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोतकर यांनी केले. आभार क्रीडा शिक्षक संदीप घावटे यांनी मानले.