रस्त्यावर ‘अपघाती मृत्यूस कारणीभूत’ ठरल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करा

0
44

अन्यथा अपघातस्थळी आंदोलन करुन प्रशासनाला जाब विचारणार : राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर

नगर – भिंगार शहरातून जाणार्‍या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट ्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वषारपासून रखडलेले आहे. त्यामुळे भिंगार ते मेहेकरी दरम्यान रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. रस्त्यांवरील खड्डेही बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. याच खड२ड्यांमुळे सुनिल विजयकुमार बेरड या शिक्षकाचा अपघाती मृत्यु झाला. त्यामुळे या रस्त्याच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट ्रवादी काँ्रग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केली आहे. यासंदर्भात कळमकर यांनी ६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, भिंगार शहरातून जाणार्‍या कल्याण-विशाखापट्टणम राष्ट ्रीय महामागारतर्गत भिंगार ते मेहेकरी दरम्यानच्या रस्त्यावर गेल्या काही महिन्यात रस्ते अपघातात तिघांचा मृत्यु झाला आहे. खड्डेमय रस्त्यावरुन वाहन चालवताना सदर अपघात होत आहेत. यास सर्वस्वी संबंधित महामार्गाच्या कामाची जबाबदारी असलेले अधिकारी जबाबदार आहेत. राष्ट ्रीय महामार्गाचे काम ठेकेदारामार्फत जलदगतीने पूर्ण करून घेण्याची जबाबदारी अधिकार्‍यांची आहे.

अधिकारीच कामचुकारपणा करीत असल्याने ठेकेदारावर अंकुश राहिलेला नाही. दरवेळी अपघात घडल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करून किंवा आश्वासन देऊन प्रशासन वेळ मारून नेते. परंतु, या प्रकाराला कारणीभूत असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई होत नाही. आताच्या अपघाता प्रकरणी प्रशासनाने संबंधित विभागाच्या अधिकार्‍यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशा कारवाईमुळे तरी अधिकार्‍यांवर जरब बसून ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतील. तसेच सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता खड्डेमुे करावा, अन्यथा आठ दिवसांनी सदर रस्त्यावर ज्याठिकाणी अपघात झाला तिथेच आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारण्यात येईल, असा इशारा कळमकर यांनी दिला आहे. यावेळी शिक्षक सेलचे रविंद्र गावडे, राहुल पवार, भिमराज कराळे, चैतन्य ससे, राज पठाण, ऋषिकेश शेटे आदी उपस्थित होते.