सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नगर – नगर जिल्ह्यातील एका २४ वर्षीय युवतीचा फोटो वापरून तिच्या नावाने इंस्टाग्राम या सोशल मिडिया साईटवर बनावट खाते उघडून युवतीची व तिच्या कुटुंबाची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात एका व्येीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील कोल्हार (ता. पाथर्डी) येथील एका २४ वर्षीय युवतीने याबाबत फिर्याद दिली आहे. सदर युवती ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तिला तिचा फोटो वापरून कुणीतरी बनावट इंस्टाग्राम खाते उघडले असल्याची माहिती मैत्रिणींकडून मिळाली. तिने याबाबत खात्री केली असता सदर खाते हे १९ डिसेंबर २०२३ रोजी रात्री उघडण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. एका मोबाईल नंबर धारक अज्ञात व्येीने ते उघडल्याचे निदर्शनास आल्यावर सदर युवतीने सोमवारी (दि.५) नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्येी विरोधात भा.दं.वि. कलम ५०० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.