नगर – राज्य शासनाने शिर्डी येथील पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांची नाशिक शहर सहायक पोलीस आयुे म्हणून केलेली बदली पुन्हा रद्द केली असून मिटके यांची आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक पदी नियुेी केली आहे. सोमवारी (दि.५) रात्री याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. उपअधीक्षक संदीप मिटके यांनी यापूर्वी नगर शहर, श्रीरामपूर तसेच शिर्डी येथे काम केलेले आहे. नगर जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास तसेच नगर शहरातील महत्त्वाचा मानला जाणारा मोहरम बंदोबस्त, गणेशोत्सव, त्यांनी चोखपणे पार पाडलेला आहे. श्रीरामपूर येथे असताना डीग्रस येथील गोळीबार घटनेची परीस्थिती अत्यंत कुशलतेने त्यांनी हाताळली, तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी वेश्याव्यवसाय चालणार्या ठिकाणी छापा टाकून अनेक पीडितांची सुटका त्यांनी केली असून श्रीरामपूरातील मुल्ला कटर टोळी विरुद्ध मो क्का लावून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
त्यांचे नगर जिल्ह्यातील काम हे उल्लेखनीय ठरलेले आहे. आता संदीप मिटके यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा सध्या नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याचा तपास करत आहे. न्यायालयाने या तपासाबाबत वेळोवेळी नाराजी व्ये करत पोलिसांवर ताशेरे ओढलेले आहेत. ५ फेब्रुवारी रोजीही न्यायालयाने पोलिसांना खडे बोल सुनावलेले आहेत. त्यामुळे या तपासाचे मोठे आव्हान उपअधीक्षक मिटके यांच्यापुढे असणार आहे.