महिलांनी देखील क्रीडा क्षेत्राकडे वळावे : स्नेहलता सोमानी

0
41

नगर – क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून माहेश्वरी समाजातील महिला एकत्र येऊन व्यायामाचे महत्व पटवून देण्याचे काम केले आहे, धावपळीच्या युगात महिला स्वत… कडे दुर्लक्ष करतात त्यातून त्यांना आरो१/२याच्या समस्येला सामोरे जावे लागते. खेळाच्या माध्यमातून सवारचे आरो१/२य सदृढ आणि निरोगी राहत असते, तसेच मानसिक ताण तणाव कमी होण्यास देखील मोठी मदत होत असते, त्यामुळे महिलांनी देखील क्रीडा क्षेत्राकडे वळावे, विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे गरजेचे आहे, हाच उद्देश समोर ठेवून सावेडी येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने स्पोर्ट दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे प्रतिपादन माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्षा स्नेहलता सोमानी यांनी केले. कल्याण रोड येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विशाल प्रांगणात सावेडी मधील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने स्पोर्ट दिनानिमित्त स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी अध्यक्षा स्नेहलता सोमानी यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अलका नावंदर, वैशाली मालपाणी, सुखदा माहेश्वरी, कविता काकाणी, कविता भंडारी, ज्योती सोमाणी, शितल बिहाणी, पूजा बिहाणी, कविता मंत्री, दुर्गा जाजू, प्रीती झंवर, स्वाती सोमाणी, शैलजा सारडा, शोभा काकाणी, निर्मला बंग उपस्थित होत्या. माहेश्वरी महिला मंडळ, सावेडीच्या वतीने आयोजित स्पधारसाठी महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला, पहाटेच्या प्रसन्न वातावरणात, हलयाशा गुलाबी थंडीत मॅरेथॉन स्पर्धेसाठी उत्साहात धावणार्‍या स्त्रिया, मुली यांनी कल्याण रोड गजबजून गेला होता, यानंतर वॉकेथॉन, कॅरम, चेस, बॅडमिंटन टेबल टेनिस, दोरीच्या उड्या, सापशिडी, तीन पायांची शर्यत, होपस्कॉच, बुक बॅलेंसिंग, बलुन बॅलेंसिंग, सॅकरेस इत्यादी स्पधार उत्साहात पार पडल्या शामा मंत्री प्रस्तुत जुन्या सुमधुर गाण्यावर आधारित अप्रतिम योगनृत्याने पाच वर्षाच्या चिमुकली पासून ७५ वर्षाच्या आजीबाई सवारना ठेका धरायला भाग पाडले.

सावेडी येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने स्पोर्ट दिनानिमित्त आयोजित स्पर्धेला प्रतिसाद

अनुप्रिता झंवरने खुपच जोशात झुंबा नृत्य सादर करत उपस्थित सवारना ही नाचायला भाग पाडले. प्रकल्प प्रमुख सुनंदा सोमाणी अलका बलदवा आणि इतरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पारितोषिक वितरण समारंभास प्रारंभ झाला. या पुर्वी हिंदू जनजागृती मंचाने आत्मसंरक्षणासाठीची प्रात्यक्षिके सादर केली. महिला वर्गाचा एवढा ओसंडून जाणारा उत्साह पाहून यापुढे प्रत्येक वर्षी स्पोर्ट दिनाचं आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी भावना सुनंदा सोमाणी यांनी यावेळी व्ये केली. अहमदनगर शहरातील सर्व माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा व स्पोट२र्स दिनासाठी आर्थिक समर्थन देणार्‍या प्रायोजक यांचा सत्कार करण्यात आला. सहभागी गृहिणी मनोगत व्ये करताना म्हणाल्या की महाविद्यालयीन आयुष्य संपल्यानंतर आज प्रथमच आम्ही ग्राउंडवर अशा प्रकारे दिवसभर मुेपणे बागडलो आहोत, आजचा दिवस आनंददायी ठरला, खरंच आम्ही खुप खुप मजा केली, आम्ही खुप उर्जा घेऊन जात आहोत.असे त्यांनी सांगितले. ‘वुमंस ऑफ द डे’चा पुरस्कार प्रथम क्रमांक कविता काकाणी, द्वितीय क्रमांक रेवा झंवर, आणि तृतीय क्रमांक शमाली बिहाणी यांनी पटकावला. तसेच डॉ. शामा मंत्री यांनी सूत्रसंचालन केले तर यावेळी अलका बलदवा यांनी आभार प्रदर्शन केले.