अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे महिला सक्षमिकरणास मोठी मदत

0
76

स्मिता बरुहा यांचे प्रतिपादन; भाजपाच्या राष्ट ीय महिला कार्यकारिणी सदस्या यांच्या हस्ते श्री विशाल गणेशाची आरती

नगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने सर्वसामान्यांपासून सर्वच घटकांच्या उन्नत्तीसाठी विविध लाभदायी योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेत आज अनेक कुटूंब सुखी झाली आहेत. कुटूंबातील महिला, मुले, वृद्ध यांची विशेष काळजी घेत त्यांच्यासाठी मोफत धान्य, आयुष्यमान भारत आरो१/२य सुविधा, लखपती कन्या अशा विविध योजनांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविण्यात येत आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातही महिलांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले असून, त्यामुळे महिला बचत गटांचे सक्षमिकरणास मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे भविष्यात महिलांना आत्मनिर्भर करणार्या योजना सुरु होणार आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी ३३ ट क्के आरक्षणही मंजूर झाल्याने भविष्यात सर्वच क्षेत्रा महिलांचा ट क्का वाढणार आहे. महिलांनी आपल्यातील कौशल्यांचा उपयोग करुन या योजनांचा लाभ घेत आपली प्रगती साधली पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या केंद्र व राज्य सरकारच्या चांगल्या योजनांमुळे महिलांची भाजपा विषयी आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. भाजपा महिला पदाधिकार्‍यांनी शासनाच्या योजनांचा लाभ संबंधितापयरत पोहचविण्याचे काम करावे. पक्षात आपण करत असलेल्या कामाचे मुल्यमापन होऊन त्यानुसार आपल्यावर जबाबदारी देण्यात येणार आहेत. तेव्हा येणार्‍या प्रत्येक निवडणुकीसाठी महिला पदाधिकार्‍यांनी आपली ताकद दाखवावी. नगरमध्ये पक्षासाठी चांगले वातावरण असून, देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी महिला पदाधिकायारनी काम करावे, असे आवाहन भाजपाच्या राष्ट ्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्मिता बरुहा यांनी केले.

भाजपाच्या राष्ट ्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्मिता बरुहा नगर येथे आल्या असता, त्यांच्या हस्ते शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची आरती करण्यात आली. याप्रसंगी सचिन पारखी, प्रशांत मुथा, महेश नामदे, संतोष गांधी, सुहास पाथरकर आदिंसह महिला मोर्चा अध्यक्षा प्रिया जानवे, उपाध्यक्षा संध्या पावसे, सरचिटणीस सविता कोटा, राखी आहेर, रेणुका करंदीकर, ज्योती दांडगे, श्वेता झोंड, सुरेखा जंगम, उपाध्यक्षा निता फाटक, कालिंदी केसकर, कावेरी घोरपडे, लिला अगरवाल, माया फसले, कुसूम शेलार, अर्चना बनकर, विवेक नाईक, बाबासाहेब सानप, सुनिल सकट, ज्ञानेश्वर धिरडे आदि उपस्थित होते. याप्रसंगी प्रिया जानवे म्हणाल्या, देशातील सवारत मोठा पक्ष म्हणून भाजपामध्ये सवारना न्याय देण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सुरु केलेल्या योजनांचा देशातील प्रत्येक घटकांना लाभ होत आहे. पक्षाची सर्व घटकांना बरोबर घेऊन चालण्याची भुमिका असल्याने पक्षाशी अनेक लोक जोडले जात आहेत. नगरमध्ये महिलांचे संघटन चांगले असून, पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपयरत पोहचविण्यात येत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार महिला आघाडी पक्षाचे कार्य अधिक व्यापक करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी भाजपाच्यावतीने स्मिता बरुआ यांचा सत्कार केला.