नगर परिसरात गावठी कट्टे विकायला आलेल्या दोघांना पकडले

0
24

शेंडी बायपास आणि नागरदेवळे शिवारात एलसीबीच्या कारवाया

नगर – नगर शहरासह जिल्ह्यात गावठी कट२ट्यांचा सुळसुळाट झाला असून मोठ्या प्रमाणावर या गावठी कट२ट्यांची खरेदी – विक्री सुरु असल्याचे वारंवार समोर येत आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी नगर परिसरात शनिवारी (दि.३) एकाच दिवशी २ ठिकाणी कारवाया करत गावठी कट्टे विकायला आलेल्या दोघांना पकडले आहे. त्यांच्या कडून २ कट२ट्यांसह ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शेंडी बायपास आणि नागरदेवळे शिवारात वारूळवाडी रोडवर अशा २ ठिकाणी या कारवाया करण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अ३/४ीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांना दिले होते. या आदेशान्वये पो.नि. दिनेश आहेर हे जिल्ह्यातील अवैध अ३/४ीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना शनिवारी (दि.३) त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, विकास सुधाकर सरोदे (रा. राहुरी) हा त्याच्या साथीदारासह शेंडी बायपास या ठिकाणी तसेच ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट (रा. नेवासा) हा त्याच्या साथीदारासह नागरदेवळे गावचे शिवारात कापुरवाडी गावाकडे जाणारे रोडवर गावठी कट्टे (अि३/४शस्त्र) विकण्यासाठी येणार आहेत. ही खबर मिळताच पो.नि. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे दोन स्वंतत्र पथके नेमुन कारवाईसाठी रवाना केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील स.पो.नि.हेमंत थोरात, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, संदिप चव्हाण, संतोष खैरे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड संभाजी कोतकर, प्रमोद जाधव, अरुण मोरे यांनी अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास या ठिकाणी सापळा लावुन आरोपी विकास सुधाकर सरोदे (वय २३, रा. गुंजाळे, ता. राहुरी) यास पकडले. त्याच्या कडे १ गावठी बनावटीचा कट्टा (अि३/४शस्त्र) व २ जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याचा साथीदार लखन सुधाकर सरोदे (रा. गुंजाळे ता. राहुरी) हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे. दरम्यान दुसर्‍या कारवाईत नागरदेवळे गावाचे शिवारात वारुळवाडी गावाकडे जाणारे रोडवर आरोपी ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट (वय ३३, रा. मोरे चिंचोरा, ता. नेवासा) यास पकडण्यात आले, त्याच्या कडेही १ गावठी बनावटीचा कट्टा (अि३/४शस्त्र) व २ जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याचा साथीदार भैया शेख (पुर्ण नांव गांव माहित नाही. रा. कुकाणा, ता. नेवासा) हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे. यातील आरोपी विकास सरोदे याच्यावर एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात तर ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट याच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅट कायदा कलम ३/२५, ७ प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट हा सराईत गुन्हेगार असुन त्यांच्याविरुध्द नगर व पुणे, जिल्ह्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी, अवैध शस्त्रे बाळगणे, दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण ९ गुन्हे दाखल आहेत.