एनएबीएच मानांकनामुळे ‘सिटी केअर हॉस्पिटल’च्या गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेचा सन्मान : डॉ.परवेज ग्रॅण्ट

0
58

नगर – नॅशनल अ‍ॅक्रिडीएशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ही संस्था देशपातळीवर हॉस्पिटलमधील आरो१/२य सेवेची गुणवत्ता, रू१/२णांना मिळणारी सर्वोत्तम सेवा यासाठी मानांकन देण्याचे काम करते. एन.ए.बी. एच. मानांकन मिळण्यासाठी संबंधित हॉस्पिटलला खूप बारीक सारीक नियमांचे, मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे लागते. अनेक निकष पूर्ण केल्यानंतर नगरमध्ये सिटी केअर हॉस्पिटलला सदर प्रतिष्ठित नामांकन मिळाले याचा आनंद वाटतो. डॉ.सुराणा व त्यांच्या सहकार्‍यांच्या गुणवत्तापूर्ण आरो१/२यसेवेचा हा गौरव आहे, असे प्रतिपादन पुणे येथील रूबी हॉल लिनिकचे डॉ. परवेज ग्रॅण्ट यांनी केले. तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटलला ऑर्थोपेडिक विभागात एनएबीएच मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. डॉ.परवेज ग्रॅण्ट यांच्या हस्ते मानांकन प्रमाणपत्र हॉस्पिटलचे संचालक अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.संदीप सुराणा यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. डॉ.संदीप सुराणा यांनी सांगितले, २००८ मध्ये नगरमध्ये सिटी केअर रूबी हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर आतापयरतच्या प्रवासात रू१/२णांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिली आहे.

नवनवीन वैद्यकीय तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये आणण्यावर भर दिला. हॉस्पिटलमध्ये २० बेडचा प्रशस्त आयसीयु, ७ व्हेंटिलेटर, मॉनिटर, डिफ्रिबीलेटर असून अतिगंभीर रू१/२णांसाठी आवश्यक अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये मेंदू, मणके, गुडघे, पोटांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. अत्याधुनिक कॉम्प्युटर गायडेड रोबॅटिक शस्त्रक्रियांची सुविधाही येथे आहे. डाय३/४ोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी, एस रे, सिटी स्कॅन, एमआरआय सुविधा उपलब्ध आहेत. २४ तास तज्ज्ञ डॉटर्स, प्रशिक्षित स्टाफ, हायजेनिक वातावरण हॉस्पिटलमध्ये आहे. याशिवाय सर्व कॅशलेस सुविधांचाही लाभ रू१/२णांना मिळवून दिला जातो. शासकीय योजनेंतर्गत उपलब्ध उपचार सुविधाही येथे आहेत. एनएबीएच मानांकन मिळाल्याने हॉस्पिटलच्या गुणवत्तापूर्ण आरो१/२य सेवेवर आणखी एक शि क्कामोर्तब झाले आहे. डॉ.परवेज ग्रॅण्ट यांनी केलेले कौतुक.