ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग युवा पिढीला प्रेरणादायी व ऊर्जा देणारा : बाबासाहेब वाकळे

0
36

भुतकरवाडी येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयाचा लोकार्पण सोहळा

नगर – ज्येष्ठ नागरिक समाजामध्ये वावरत असताना त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे जेष्ठांच्या अनुभवाचा उपयोग आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी व ऊर्जा देणार आहे ज्येष्ठ नागरिक हे तरुणांना लाजवेल, असे चांगले काम समाजामध्ये करत आहे. श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन समाजामध्ये चांगले काम उभे करत आहे. कै. निवृत्ती नाना लांडे यांनी खर्‍या अर्थाने वयोवृद्धांना एकत्र करून ज्येष्ठ नागरिकांची संघटना स्थापन केली व या माध्यम ातून आपल्या विचाराची देवाण-घेवाण सुरू झाली ज्येष्ठ नागरिकांना आपले आयुष्य सुखकर व आनंददायी जावे यासाठी त्यांना एकत्र येऊन बसण्यासाठी भव्य दिव्य असे कार्यालय उभे करून दिले आहे. ज्येष्ठ नागरिक हे समाजामध्ये महत्त्वाचा घटक असून त्यांच्या मार्गदर्शनाची खरी गरज असल्याचे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले, भुतकरवाडी येथे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयाचा लोकार्पण सोहळा झाला.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे, माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर, माजी नगरसेविका वंदना ताठे, विलास ताठे, अंबादास बेंद्रे, गणपत हिंगे, विश्वनाथ जाधव, संभाजी काळे, दिनकर देशमुख, रत्नमाला लांडे, चंपावती जगताप, कन्हैय्यालाल चोरडिया, दत्तात्रय भगत, पुष्पा बोरुडे, पांडुरंग धरम, बाबासाहेब भिंगारदिवे, मनीराम सावरकर, चंद्रशेखर सत्रे, रमेश मुसळे, सुनील काळे, रघुनाथ कोतकर, मनोज लांडे, मनोज ताठे, विजय चितळे, शिवा आढाव, अनिल बोरुडे, साईनाथ कावट, डॉ. हरदे, विजय महादर, लक्ष्मण शिंदे, सौ. तुंगार आदी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे म्हणाले की, भुतकरवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करण्याचे काम कै. निवृत्ती नाना लांडे यांनी खर्‍या अर्थाने केले आहे आज त्यांच्या स्मरणार्थ बाबासाहेब वाकडे यांनी त्यासाठी भव्य दिव्य अशी कार्यालय उभे करून दिले आहे याचबरोबर अनिल बोरुडे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाला दोन कपाटे, टेबल दिले आहे तसेच रवींद्र बारस्कर यांनी कार्यालयात बसण्यासाठी १५ खुर्च्या दिल्या आहेत तसेच वंदना ताठे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाला ११ हजार रुपयाची मदत केली आहे. आता ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सुमारे ११० सदस्य झाले आहे यांच्यासाठी वर्षभर विविध सामाजिक उपक्रम व धार्मिकतेची सहल काढण्यात येत असते ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येऊन समाजाच्या कल्याणासाठी काम करत आहे असे ते म्हणाले. यावेळी रवींद्र बारस्कर, पुष्पताई बोरुडे, माजी नगरसेविका वंदना ताठे आदींनी आपले मनोगत व्ये केले.