‘खड्डे मुक्त शहर’ निर्माण करण्यासाठी काम सुरू : आमदार संग्राम जगताप

0
34

न्यू आर्टस कॉलेज ते अप्पूहत्ती चौक पर्यंतच्या रस्ता पॅचिंग कामाची पाहणी

नगर – अहमदनगर शहर खड्डे मुे करण्याचे काम सुरू असून रस्ता काँक्रिटीकरणासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून शहरांमधील बहुतांश भागामध्ये रस्ता काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण झाली आहे. यामध्ये टिळक रोड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील रस्ता, आनंदऋषीजी महाराज मार्ग, स्वस्तिक चौक, कोठी रस्ता, बालिकाश्रम रोड, केडगाव लिंक रोड, सोलापूर रोड, कानडे मळा, सीएसआरडी कॉलेज पयरतच्या रस्ता काँक्रिटीकरणाची कामे मार्गी लावली आहे. विविध भागातील कॉलनी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण व डांबरीकरणाची कामे पूर्ण झाले आहे. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते माळीवाडा वेशीपयरतच्या शिवजयंती मार्ग वरील रस्ता काँक्रेटीकरणाचे काम सुरू होणार आहे. दिल्ली गेट न्यू आर्टस कॉलेज, पत्रकार चौक हा रस्ता सावेडी उपनगराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या खड्डयामुळे नागरिकांना प्रवास करत असताना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरण यासाठी राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू असून, निधी प्राप्त होताच दोन्ही बाजूने आरसीसी गटार, फुटपाथ व काँक्रिटीकरणाचा दर्जेदार रस्ता निर्माण करू, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. न्यू आर्टस कॉलेज ते अप्पू हत्ती चौक पयरतच्या रस्ता पॅचिंग कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप व आयुे डॉ.पंकज जावळे यांनी केली. यावेळी राष्ट ्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माणिकराव विधाते, शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, प्रवेे अरविंद शिंदे, शहर अभियंता मनोज पारखे, यशवंत तोडमल, शुभम भुतारे आदी उपस्थित होते.