भारतातील राष्ट्रीय पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार ‘अहमदनगर सीए शाखे’ला प्राप्त

0
82

नगर – अहमदनगर सीए शाखेला २०२३ – २४ या वर्षाकरिता भारतातील राष्ट ्रीय पातळीवरील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला आहे अशी माहीती सीए शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, भारतातील एकूण १६८ शाखांमधून हा पुरस्कार दिला जातो. मागील वर्षभरातील कामगिरीचे मुल्यमापन यात होत असते. अहमदनगर सीए शाखा दरवर्षीच नवनवीन कार्यक्रम राबवत असते. सीए सभासदांसाठी शैक्षणिक कार्यक्रमाबरोबरच विविध कायद्यात होणारे बदल यावरील चर्चासत्र, त्याबद्दल सभासदांसाठी विविध तज्ञांद्वारे मार्गदर्शन, सेमीनार, कॉन्फरन्स इ. द्वारा केले जाते. अध्यक्ष सीए काळे यांनी पुढे सांगितले की, या वर्षभरात पद्मश्री पोपटराव पवार,माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, आरबीआय चे डायरेटर सतीश मराठे, सहकार आयुे अनिल कवडे, खा. सुजय विखेपाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील इ. नी संस्थेस भेट देऊन मार्गदर्शन केले. क्रेडाई संस्थेबरोबर रेरा व जीएसटी सेमिनार, सहकारी बँका – पतसंस्था सभासद – कर्मचारी यांच्यासाठी दोन दिवसीय सहकार प्रशिक्षण, सार्वजनिक ट ्रस्टमध्ये काम करत असणार्‍यांसाठी सेमिनारचे आयोजन, एमएसएमई व स्टार्टअप मध्ये असलेल्या संधी यासाठी सेमिनार तसेच आयकर, जीएसटी, शेअर मार्केट तसेच भारतातील उच्चांकी असे ५२ शाळा व महाविद्यालयातील विद्याथ्यारसाठी करिअर मार्गदर्शन, गुंतवणुकदारांसाठी माहिती अभियान, आर्थिक साक्षरता अभियान, सभासद व विद्याथ्यारसाठी क्रिकेट लीग, सांस्कृतिक कार्यक्रम इ. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले.

याबरोबरच सामाजिक कार्यातही स्वच्छ भारत अभियान, ५१ सीए मातांचा मातृपूजन कार्यक्रम, महिला सभासदांसाठी फॅशन शो, वारकर्‍यांसाठी पाणी व बिस्कीटाचे वाटप दिवाळीनिमित्त गरीब, अनाथलयात जाऊन दिवाळी फराळ वाटप, बुरुडगाव रोडवर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे सीए चौक सुशोभिकरणाचे एक सुंदर शिल्प उभे केले जात आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच हा पुरस्कार मिळाला आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी शेवटी या पुरस्कारासाठी उपाध्यक्ष सनित मुथा, सचिव प्रसाद पुराणिक, खजिनदार अभय कटारिया, सदस्य महेश तिवारी, पवन दरक व सर्व माजी अध्यक्ष, सीए सभासद, विद्यार्थी यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य मिळाले आहे त्या सवारचे आभार व्ये केले.