ग्राहकांना अधिकाधिक जलद आणि सुरक्षित सेवा देण्यावर ‘अहमदनगर मर्चंटस्‌’बँकेचा भर

0
47

अहमदनगर मर्चंटस्‌ बँकेच्या चितळे रोड शाखेत कॅश डिपॉझिट मशीनचा शुभारंभ

नगर – अहमदनगर मचरटस बँक सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करताना अत्याधुनिक बँकिंग सेवेचा विस्तार करत आहे. एटीएम मशीन नंतर आता कॅश डिपॉझिट मशीन बँकेने कार्यान्वित केली आहे. यात खातेदारांना पैसे काढता येतील तसेच पैसे भरताही येणार आहेत. ही सेवा सुटीचे दिवस धरून दररोज २४ तास उपलब्ध असल्याने ग्राहकांचा भरणा करण्यासाठी बँकेत येण्याजाण्याचा वेळ वाचणार आहे. ग्राहकांना अधिकाधिक जलद आणि सुरक्षित बँकिंग सेवा देण्यावर बँकेने कायम भर दिला आहे, असे प्रतिपादन अहमदनगर मचरटस बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमल मुनोत यांनी केले. अहमदनगर मचरटस बँकेच्या चितळे रोड शाखेत बँकेच्या रिसायकलिंग (कॅश डिपॉझिट) मशीनचा शुभारंभ हस्तीमल मुनोत यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी मशीन द्वारे खात्यात सर्वप्रथम र क्कम जमा करणारे बँकेचे खातेदार एस. जी. कायगांवकर ज्वेलर्सचे संचालक सागर कायगांवकर, व्हा.चेअरमन अमित मुथा, संचालक आनंदराम मुनोत, किशोर मुनोत, संजय बोरा, मीनाताई मुनोत, सी.ए. मोहन बरमेचा, संजीव गांधी, सीईओ सुनील पुराणिक, जॉइंट सीईओ नितीन भंडारी, प्रसाद गांधी, शाखाधिकारी श्रीमती जाधव आदी उपस्थित होते.

हस्तीमल मुनोत पुढे म्हणाले, चितळे रोड शाखेत पहिले मशीन कार्यान्वित केले असून येत्या काळात नगर शहरातील इतर शाखेतही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. या मशीनमध्ये १००, २००, ५०० च्या नोटा जमा करण्याची सोय आहे. एका वेळी ग्राहकांना ४९ हजार ५०० रूपये इतकी र क्कम जमा करता येईल. डेबिट कार्ड नसलेले ग्राहक आपला १५ अंकी खाते क्रमांक टाकून सेवेचा लाभ मिळवू शकतील. मचरटसच्या खातेदारांसाठी त्यांच्या मचरटस बँकेतील कोणत्याही शाखेतील खात्यासाठी ही सेवा नि…शुल्क उपलब्ध आहे. इतर बँकेच्या खात्यातही या मशिनद्वारे पैसे जमा करता येणार आहेत, त्यासाठी चार्जेस आकारले जातील. सागर कायगांवकर म्हणाले, अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सेवा देण्यात मचरटस बँकेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. कॅश डिपॉझिट मशीनमुळे आता रोकड बाळगण्याची गरज राहणार नाही. सुटीच्या दिवशीही बँकेत भरणा करता येणार आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात बँकेने ग्राहकांना आणखी एक चांगली भेट दिली आहे. शेवटी व्हा. चेअरमन अमित मुथा यांनी आभार मानले.