२०० केव्हीचा ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम सुरू; केडगाव परिसरातील विजेचा प्रश्न कायमचा सुटणार

0
67

२०० केव्हीचा ट्रान्सफार्मर बसविण्याच्या कामाचा केडगाव येथे शुभारंभ करण्यात आला

नगर – केडगाव देवी परिसरातील विजेचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी २०० के.व्ही. चा ट ्रान्सफार्मर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांच्या हस्ते झाला. केडगाव देवी परिसराचा विस्तार झपाट्याने झाला असताना वाढलेली विजेची मागणी व कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होते. अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून नवीन ट ्रान्सफार्मर बसवून हा प्रश्न सोडविण्याचे काम सुरु झाले आहे. या उद२घाटनासाठी उद्योजक जालिंदर कोतकर, नगरसेवक मनोज कोतकर, सुनीलमामा कोतकर, राहुल कांबळे, गणेश नन्नवरे, महेंद्र कांबळे, इंजि. प्रसाद आंधळे, रावसाहेब मतकर, बच्चन कोतकर, श्याम कोतकर, सोपानराव कोतकर, मच्छिंद्र कोतकर, भूषण गुंड, अशोक कराळे, अनिल ठुबे, सुमित लोंढे, सागर सातपुते, गणेश सातपुते, पोपट ठुबे, सुरज शेळके, पोपट कराळे, महेश कोतकर, केतन भंडारी, योगेश कोतकर, सुरेश झरेकर, नवनाथ कोतकर, जमदाडे सर, सोपानराव कोतकर, किशोर कोतकर, उमेश कोतकर यांच्यासह विद्युत महावितरणचे कर्मचारी व केडगाव ग्रामस्थ उपस्थित होते. जालिंदर कोतकर म्हणाले की, केडगावमध्ये शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. शहराचा सर्वात मोठा उपनगर म्हणून केडगावचा विस्तार सुरु आहे. केडगाव देवी परिसरात देखील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यांना विजेचा मोठा प्रश्न भेडसावत होता. कमी दाबाने वीज पुरवठा व अवेळी वीज खंडित होत होती. हा प्रश्न खासदार डॉ. विखे यांच्या प्रयत्नाने सोडविण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून, उन्हाळ्यात त्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.