शहर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिक त्रस्त

0
23

तातडीने बंदोबस्त करण्याची महापालिकेकडे मागणी

नगर – शहर आणि परिसरात भटया कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भटया कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे आतापयरत अनेकांना उपचार घ्यावे लागले आहेत. लहान मुले, महिला, वृद्ध यांना अनेकदा या भटया कुत्र्यांच्या टोळयांमुळे रस्ता बदलून प्रवास करावा लागतो. तरी तातडीने या भटया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व नागरिकांची यापासून सुटका करावी अशी मागणी अशोक बलदोटा (माणिकचौक) यांनी केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुे यांना दिलेल्या निवेदनात बलदोटा यांनी म्हटले आहे की, शहरातील खिस्त गल्ली, कैलास डेअरी, चर्च परिसरातील चांद सुलताना हायस्कूल परिसरात १५ ते २० मोठमोठ्या भटया कुत्र्यांचे टोळके फिरत आहे. या कुत्रांचा वावर रस्त्यावरच असल्याने आतापयरत ६ ते ८ लोकांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. रस्त्याने ये-जा करणार्‍या हरेक व्येीवर ही कुत्री धावून जातात व चावा घेण्याचा प्रयत्न करतात. धावत अंगावर येत असलेल्या कुत्र्याला पाहून अनेक दुचाकी चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडतात. तरी या परिसरातील भटया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बलदोटा यांनी केली आहे.