जनावरांची वाहतूक करणाऱ्या २ जणांवर गुन्हा दाखल

0
18

नगर – पिकअपमधून दाटीवाटाने जनावरांची वाहतूक करणार्‍या दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब गुलाम शब्बर कुरेशी (वय २९ रा. व्यापारी मोहल्ला, नगर), जावेद पीरमोहम्मद सय्यद (वय २८ रा. फकीरवाडा, मुकुंदनगर) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस अंमलदार महेश पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे बांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलटार शाहीद शेख, सलीम शेख, अभय कदम, अतुल काजळे, रवी टकले, प्रमोद लहारे यांचे पथक शनिवारी (दि. ३) दुपारी हद्दीत गस्त घालत असताना त्यांना दुपारी तीनच्या सुमारास एक संशयित पिकअप कायनेटीक चौकात दिसला. पथकाने पिकअप थांबवून पाहणी केली असता त्यात तीन जनावरे दाटीवाटीने व चारा पाण्याची व्यवस्था न करता मिळून आली. पोलिसांनी पिकअपमधील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.