अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नसल्याचा केला निषेध

0
59

नगर – भिंगारमधून जाणार्‍या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग शहापूर ते मेहेकरी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमावा लागत असून, मागील ३ ते ४ वर्षापासून कल्याण अहम दनगर, नांदेड या मार्गाचे काम संत गतीने सुरू आहे. या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे, अशा मागणीसाठी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग अहमदनगरचे उपविभागीय अभियंता दि.ना. तारडे यांच्या कार्यालयावर चपलाचा हार घेऊन आंदोलन करण्यात आले होते. येत्या १५ दिवसानंतर रस्त्याचे तांत्रिकदृष्ट्या उत्तम डांबरीकरणाने खड्डे बुजवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रस्त्याचे काम अद्यापही चालू करण्यात आले नाही. त्यामुळे २ फेब्रुवारीला माजी सरपंच व नगरच्या आठरे पाटील पब्लिक स्कूल मधील शिक्षक सुनील विजयकुमार बेरड यांचा मृत्यू झाला. कल्याण राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर झाले होते मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. हा राष्ट्रीय महामार्ग ३ वर्षापासून खड्डेमय झाला असून नागरिकांना पायी चालणे ही कठीण झाले आहे. गेल्या १ महिन्यात स्टेट बँक चौक ते चांदबिबी महालापर्यंतच्या रस्त्यावर ३ जण मृत्युमुखी पडले असून यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यातच या खड्डेमुळे रस्त्यावरून जात असताना खड्डे चुकवताना माजी सरपंचाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने ग्रामस्थ आक्रमक झाले व गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले यावेळी ग्रामस्थासह अनेक नागरिक यांनी आमदार संग्राम जगताप व जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. ८ दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अन्यथा स्टेट बँक चौकात १० फेब्रुवारी रोजी ग्रामस्थ व भिंगार मधील नागरिक यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते व सर्पमित्र कृष्णा बेरड यांनी दिला आहे.