दुपारी सेफ्टी दरवाजा बसवला अन्‌ सायंकाळी झाली घरफोडी

0
58

केडगाव येथील घटना; चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड पळविली; गुन्हा दाखल

नगर – वाढत्या चोर्‍या, घरफोड्या पाहता सुरक्षेसाठी दुपारी घराला लोखंडी सेफ्टी दरवाजा बसवला अन सायंकाळी तेच घर चोरट्यांनी फोडत घरातील कपाटात ठेवलेले दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना केडगाव उपनगरातील अंबिका विदयालयाच्या पाठीमागील गील बाजुस असलेल्या पाटील कॉलनीत ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.४५ ते ८.३० या कालावधीत घडली. याबाबत यशवंत सावळेराम फुलारी (वय ५६, रा. अंबिका विदयालयाजवळ, पाटील कॉलनी, केडगांव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फुलारी यांचे किराणा दुकान आहे. ते व त्यांची पत्नी दररोज सायंकाळी घराला कुलुप लावुन किराणा दुकानात जातात व रात्री घरी परततात. सध्या शहर परिसरात चोर्‍या, घरफोड्या वाढलेल्या असल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या ओळखीच्या व्येी कडून शुक्रवारी (दि.२) दुपारीच घराला लोखंडी सेफ्टी दरवाजा बसवला होता.

त्यानंतर सायंकाळी ५.४५ च्या सुमारास फुलारी व त्यांच्या पत्नी सेफ्टी दरवाजा कुलूप लावून दुकानात गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नी वैशाली या रात्री ८.३० च्या सुमारास घरी गेल्या असता त्यांना घराचे सेप्टी दरवाजाचा कोंडा तुटलेला दिसला. त्यानंतर त्यांनी आतमध्ये जावुन पाहणी केली असता बेडमधील लोखंडी कपाट उघडे असलेले दिसले, कपाटातील ड ्रॉवरमध्ये पाहिले असता त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच १५ हजारांची रोख र क्कम असा ३३ हजारांचा ऐवज दिसून आला नाही. याबाबत त्यांनी मुलाला व फुलारी यांना कळविले. फुलारी यांनी घरी जावून पाहिल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. याबाबत फुलारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.