खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा आंदोलन करणार : भिंगार काँग्रेस
नगर – भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने भिंगार मधून जाणार्या राष्ट ्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर पडलेल्या खड्डयाचे पुष्पहार व हळदी-कुंकू वाहुन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष सागर चाबुकस्वार, कार्याध्यक्ष बाळासाहेब भिंगारदिवे, प्रदिप भिंगारदिवे, भुषण भिंगारदिवे, सागर खरे, पुरणदास उदासी, रामलिंग मेणसे, भागचंद राऊत, राजु कडुस आदिसह नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी सागर चाबुकस्वार म्हणाले, काही दिवसांपुर्वी भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे व खड्डे बुजवण्यात यावे, याबाबत खासदार डॉ.सुजय विखे पाटील व प्रशासनास निवेदन दिले होते. त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. काल सकाळी या रस्त्यावरील खड्डे चुकवताना प्राचार्य सुनिल बेरड यांना जीव गमवावा लागला. तसेच दररोज छोटे-मोठे अपघात होत असतात. यापुढे जर अशा घटना घडत राहिल्या तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल भिंगार शहर काँग्रेस कमिटी तर्फे उपस्थित करण्यात आला. लवकरात लवकर या महामार्गावरचे खड्डे बुजवण्यात यावे, नाहीतर खुप मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल, असा इशाराही सागर चाबुकस्वार यांनी यावेळी दिला.