भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड केली लंपास; गुन्हा दाखल

0
35

नगर – घर भरदिवसा फोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व ३५ हजारांची रोकड असा ७० हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि. २) सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत नगर तालुयातील मेहेकरी गावात घडली आहे. याबाबत पार्वती विठ्ठल पवार (रा. सद्गुरू हायस्कुल पाठीमागे मेहेकरी, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पवार यांनी त्यांचे घर शुक्रवारी सकाळी ११ वाजता बंद केले होते. त्याकामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचे घर फोडून सामानाची उचकापाचक केली. घरातील सोन्याचे मंगळसूत्र, एक सर व कानातील बुगड्या असे दागिने तसेच ३५ हजारांची रोकड असा ७० हजारांचा ऐवज लंपास केला. घर फोडून दागिने चोरीला गेल्याचा प्रकार दुपारी २ वाजता पवार यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. सहा.पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली असून पवार यांच्या फिर्यादीवरून विरुद्ध भा.दं. वि. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.