कुरिअरची फ्रेंचाइजी देण्याच्या नावाखाली साडेतीन लाखांची ऑनलाईन फसवणूक

0
52

नगर – डी.टी.डी.सी. या कुरिअर कंपनीची फ्रेंचाइजी देण्याच्या नावाखाली भिंगार मधील युवकाची एका भामट्याने सुमारे ३ लाख ४६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ही फसवणूक करणार्‍या कंपनीच्या तोतया अधिकार्‍यांवर भिंगार कम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रवीण प्रकाश गारदे (रा. द्वारकाधीश कॉलनी, आलमगीर रोड, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांना जानेवारी महिन्यात एका व्येीने मोबाईलवर फोन करून आपण टी.डी.सी. या नामांकित कुरिअर कंपनीत अधिकारी असून या कंपनीची फ्रेंचाइजी भिंगारमध्ये द्यायची असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गारदे यांनी याबाबत उत्सुकता दाखविली. त्यानंतर त्या तोतयाने गारदे यांचा विश्वास पटण्यासाठी वेळोवेळी त्यांच्या कडून कागदपत्रे व विविध शुल्काच्या नावाखाली ऑनलाईन पैसे मागवून घेतले. ३ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत गारदे यांनी त्याला सुमारे ३ लाख ४६ हजार रुपये ऑनलाईन पाठविले. मात्र त्यानंतर त्याने गारदे यांचे फोन घेण्यास टाळाटाळ सुरु केली. सुमारे १७ ते १८ दिवस पाठपुरावा करूनही कुरिअर कंपनीची फ्रेंचाइजी मिळाली नाही आही दिलेले पैसेही परत मिळाले नाहीत त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गारदे यांनी शुक्रवारी (दि.२) भिंगार कम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी त्या अज्ञात तोतया व्येीवर भा. दं. वि. कलम ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.