पाणी योजनेचे ५ लाखांचे लोखंडी पाईप गेले चोरीला

0
82

ठेकेदाराची पोलिस ठाण्यात तक्रार; अज्ञातांवर गुन्हा दाखल

नगर – नळ पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी ठेकेदाराने कामाच्या साईटवर आणून ठेवलेले सुमारे ५ लाख रुपये किंमतीचे ८०० एम एन व्यासाचे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ठेकेदार सिध्देश्वर अंकुश जगताप (वय ३६, रा-माडगे मळा, बुरुडगाव रोड, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. जगताप यांची एस आर कन्स्ट ्रशन नावाची संस्था असून या संस्थेच्या मार्फत अरणगाव (ता.नगर) पाणीपुरवठा योजनेचे काम त्यांनी घेतलेले आहे. सदर काम एमआयडीसी कडुन अरणगाव कडे जाणार्‍या रेल्वे क्रॉसिंगजवळ चालु होते. सदर ठिकाणी त्यांनी ८०० एम. एम.व्यासाचे लोखंडी पाईप ठेवलेले होते. २५ डिसेंबर पासून काम बंद होते. त्यानंतर काम सुरु करण्यात आल्यावर शुक्रवारी (दि.२) दुपारी कामावर देखरेख करणारे विठठल कोळेकर (रा.राळेगण म्हसोबा, ता.नगर) यांनी त्यांना फोन करून सांगितले की कामावरती ठेवलेले ८०० एम एम व्यासाचे ५ लाख रुपये किंमतीचे १६ लोखंडी पाईप येथे दिसत नाहीत. ही माहिती मिळाल्यावर जगताप यांनी त्या ठिकाणी जावून पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र पाईपची काहीही माहिती न मिळाल्याने ते कोणी तरी चोरून नेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.