राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे न बुजवल्यास रास्तारोको : आ. संग्राम जगताप

0
15

नगर – कल्याण राष्ट ्रीय महामार्गाचे काम मंजूर झाले होते, मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम पूर्ण होवू शकले नाही, त्यामुळे नेप्ती बायपास चौक ते नेप्ती नाका आणि स्टेट बँक चौक चांदबीबी महालापयरतच्या राष्ट ्रीय महामार्ग हा गेल्या ३ वर्षापासून खड्डेमय झाला असून नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावर सातत्याने छोटे-मोठे अपघात होवून काही जण जखमी झालेत तर अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या १ महिन्यात स्टेट बँक चौक ते चांदबीबी महालापयरतच्या रस्त्यावर ३ जण दुर्दैवी मृत्यूमुखी पडले असून, यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच या खड्डेमय रस्त्यावरून जात असताना खड्डे चुकवताना माजी सरपंचांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या घटनेने ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यावेळी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेत ८ दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजवावे अन्यथा स्टेट बँक चौकात १० फेब्रुवारी रोजी ग्रामस्थ व भिंगारमधील नागरिकांच्यावतीने तीव्र रस्तारोको आंदोलन केले जाईल, असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी दिला स्टेट बँक चौक ते चांदबीबी महालपयरतच्या राष्ट ्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी आ. संग्राम जगताप व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेतली.

यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट ्रीय महामार्गाचे अभियंता तारडे, कृष्णा बेरड, सुधीर लांडगे, गजानन भांडवलकर, संतोष भालसिंग, गोविंद काळे, वैभव गुंड, अमोल गायकवाड, ऋषिकेश खामकर, ओंकार बेरड, सुनील देवकर, सोपान दांगडे, शरद दारकुंडे, सतिश बेरड, संतोष बेरड, प्रशांत बेरड, अशोक चव्हाण, भाऊसाहेब बेरड, हनुमंत घोलप, मारुती गाडेकर, भानुदास नाटक, अशोक बेरड, विष्णू बेरड, राम बेरड, आदीसह शहापूर ग्रामस्थ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी राष्ट ्रीय महामार्गाचे अभियंता तारडे यांना बोलावून घेत संबंधित रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे असे आदेश दिले तसेच अपघातात नागरिकांचा नाहक बळी जात असून यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना मोबाईलद्वारे घडलेल्या अपघाताचे दृश्य दाखवले तेव्हा जिल्हाधिकारी व आमदार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.