वर्दळीच्या चौकात मारहाण करून रोख रक्कम व मोबाईलची केली चोरी

0
9

नगर – नगर शहरातील एका हॉटेल मध्ये कॅप्टन म्हणून काम करणार्‍या युवकाला शहरातील मोठी वर्दळ असलेल्या स क्कर चौक परिसरात चारचाकी वाहनातून आलेल्या ५ जणांनी मारहाण करत लुटल्याची घटना शुक्रवारी (दि.२) मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. याबाबत शुभम संजय आरक (वय २४, रा. हॉटेलच्या पाठीमागे, आनंदऋषी हॉस्पीटलजवळ, मु.रा. गोदावरी वसाहत, साकोरी ता. राहाता) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आरक हा स्वस्तिक चौकातील रेडीयंस हॉटेल येथे दुपारी ३ ते रात्री ११.३० या वेळेत कॅप्टन म्हणुन काम करतो. शुक्रवारी तो कामावर गेल्यावर हॉटेल मालकाने त्याला त्याच्या पगाराचे १५ हजार २०० रुपये रोख स्वरुपात दिले होते. रात्री ११.३० च्या सुमारास जेवण करून हॉटेल बंद झाल्यानंतर पगाराचे दिलेले पैसे घेवुन तो घरी पायी जात असताना रात्री १२.०५ चे सुमारास अजिंय फिटनेससमोर, नगर पुणे रोडवर, हॉटेल यश पॅलेसजवळत्याचे पाठीमागुन येणारी पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (क्र.एम. एच. १२ एम. डब्ल्यु. ९५४८) चालकाने त्याला समोरुन आडवी लावली.

गाडीमध्ये एकूण ६ अनोळखी इसम होते, त्या गाडीतुन ५ इसम खाली उतरले व काही कारण नसताना त्यांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने त्याची गचांडी धरली व बाकीच्यांनी हाताने मारहाण करुन त्याच्या पॅन्टच्या १५ हजार २०० रुपये रोख र क्कम व विवो कंपनीचा मोबाईल बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर दमबाजी करत सदर अनोळखी इसम तेथून त्यांचे गाडीमधुन निघुन गेले. त्यानंतर आरक याने कोतवाली पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.