शहरासह जिल्ह्यात बेकायदेशिर कत्तलखाने; कारवाई करा अन्यथा निषेध मोर्चा काढणार

0
49

हजारोंच्या संख्येत रस्त्यावर उतरणार : बजरंग दलाचा निवेदनाद्वारे पोलिस व प्रशासनाला इशारा

नगर – नगर शहर व जिल्ह्यातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करावी, अन्यथा १५ दिवसानंतर बजरंग दलाच्यावतीने नगर शहरात हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, नगर शहरातील झेंडीगेट भागात ५ मोठे कत्तलखाने चालु असून या ठिकाणी रोज सर्रासपणे शेकडो गायींची बेकायदेशीर कत्तल होत असून याचे रक्ताचे मैला मिश्रीत पाणी झेंडीगेट भागातुन जाणार्‍या नाल्यातुन सारसनगर भागातील एका ओढ्यामध्ये वाहात असून त्याला लागुनच असणार्‍या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ते जात आहे. त्यामुळे शहरातील हजारो नागरीकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होणार असून रोगराई पसरण्याची दाट शयाता आहे. याबाबत यापुर्वी अनेकवेळा निवेदन देऊन देखील कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई अद्यापपावेतो झालेली नसल्याने सदरील आरोपी यांना कायद्याचे भय राहिलेले नसून ते कायद्याला जुमानत नसून गोरक्षकांवर वेळोवेळी जिवघेणे हल्ले करतात. तसेच गोरक्षकांवर खोट्या स्वरुपाचे गुन्हे दाखल करतात. कत्तलीतुन मिळालेल्या पैशाचा लव जिहाद, लॅण्ड जिहाद, धर्मांतरण व आतंकवाद्यांना देशविरोधी कारवाया करण्यासाठी पैशाची मदत करत असतात. त्यामुळे आपण हे कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत. सदरील कसायांवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असून ते शहरात मोकाट फिरतात. या कत्तलीसाठी वापरणारी वाहने, जमीन, मालमत्ता व बेकायदेशीर जमवलेल्या मालमत्तेची इडी मार्फत चौकशी करुन त्यांची मालमत्ता सरकार जमा करावी. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. अन्यथा १५ दिवसात बजरंग दलामार्फत नगर शहरात हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरुन निषेध मोर्चा काढला जाईल. त्यानंतर उद्भवणार्‍या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा कुणाल भंडारी यांनी दिला आहे.