सहलीच्या बसवर दगडफेक करणाऱ्यांवर ‘मोक्का’ची कारवाई करण्याची मागणी

0
30

‘मोक्का’ची कारवाई करण्याची मागणी नगर – नगर तालुयातील सोनेवाडी येथील ज्ञानदिप माध्यमिक विद्यालयाच्या सहलीच्या एस.टी. बसवर कोल्हापुर येथे दगडफेक करणार्‍या आरोपींवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी केली आहे.याबाबत त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे, यामध्ये म्हंटले आहे की, सोनेवाडीच्या ज्ञानदिप माध्यमिक विद्यालयाच्या शाळेच्या सहल बसवर कोल्हापुर येथील दसरा चौकात ३० जानेवारी रोजी काही लोकांकडून हल्ला करण्यात आला. तरी या सर्व घटनेचा सखोल तपास करुन संबंधित आरोपींवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करुन त्यांच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरवण्याची कारवाई करावी जेणेकरुन अशा मानसिकतेच्या लोकांना कडक असा इशारा मिळेल, अन्यथा बजरंग दलामार्फत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भंडारी यांनी दिला आहे.