नगर – शहरातील बाजारपेठेत एम.जी. रोडवर एका दुकानात काम करणार्या १७ वर्षीय युवतीला ती रस्त्याने पायी जात असताना दोन युवकांनी बळजबरीने कारमध्ये बसवून तिचे अपहरण केले. नंतर कार नगर-मनमाड रोडने नेवून बोल्हेगावजवळ कारसह युवतीला तेथे सोडून त्या दोघा अपहरणकत्यारनी पलायन केल्याची घटना गुरुवारी (दि.१) दुपारी घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १७ वर्षीय पिडीत युवतीने फिर्याद दिली आहे. सदर युवती बाजारपेठेत एम.जी. रोडवर एका दुकानात काम करते. ती गुरुवारी (दि.१) दुपारी २.४५ च्या सुमारास एम.जी. रोडवरून भिंगारवाला चौकाजवळ असलेल्या एका वडापावच्या दुकानात मैत्रिणीसोबत वडापाव आणण्यासाठी पायी जात होती. त्यावेळी जुना बाजार रस्त्यावर समोरून एक काळ्या रंगाची कार आली, त्यातून दोन युवक खाली उतरले, त्यांनी या युवतीला बळजबरीने कारमध्ये बसवून तिचे अपहरण केले. कार नगर-मनमाड रोडने घेवून गेले.
बोल्हेगावजवळ कारसह युवतीला सोडून अपहरणकत्यारचे पलायन
रस्त्यात दोन ठिकाणी त्यांनी युवतीचा मोबाईल घेवून कार लॉक करून बाहेर गेले. पुन्हा कारमध्ये आले व कार बोल्हेगाव जवळ काकासाहेब म्हस्के कॉलेजच्या कमानीजवळ कार थांबवुन त्या युवतीचा मोबाईल तिच्याकडे देवून तिला कारमध्ये तसेच सोडून तेथून निघून गेले. त्यानंतर त्या युवतीने नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली. तेथून रिक्षाने नगरमध्ये आली. त्यानंतर नातेवाईकांच्या समवेत कोतवाली पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा अनोळखी अपहरणकत्यारवर गुन्हा दाखल केला आहे.