नगर – भिंगारमधून जाणार्या कल्याण विशाखापट्टणम . राष्ट ्रीय महामार्गाची दुरावस्था गेल्या अनेक महिन्यांपासून कायम असून, या महामार्गावरील खड२ड्यांमुळे भिंगार मध्ये शुक्रवारी (दि.२) सकाळी आणखी एकाचा बळी गेला आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकी घसरून खाली पडलेल्या दुचाकीस्वाराच्या डोयावरून मालट ्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पाथर्डीकडे जाणार्या रोडवर भिंगार वेशीच्या पुढे असलेल्या कमानीजवळ सकाळी ८.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार सुनील विजयकुमार बेरड (वय ५२, रा. शहापूर, ता. नगर) यांचा मृत्यू झाला आहे. मयत बेरड हे आठरे पाटील पब्लिक स्कुलमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी ते शहापूर येथून मोपेडवर भिंगारमार्गे नगरकडे येत असताना जिल्हा बँकेच्या शाखेसमोर रस्त्यावर असलेले खड्डे चुकविताना त्यांची मोपेड घसरली व ते रस्त्यावर खाली पडले, त्याचवेळी पाठीमागून येत असलेल्या मालट ्रकचे चाक त्यांच्या डोयावरून गेले.
भिंगार येथील घटना; कल्याण- विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गाच्या मोठ्या दुरावस्थेने घेतला आणखी एक बळी
हेल्मेट घातलेले असूनही अवजड मालट्रकचे चाक डोयावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी सकाळीच हा अपघात झाल्याने तेथे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या अपघाताने बराच वेळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या अपघाताची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत बेरड यांचा मृतदेह रु१/२णवाहिकेतून जिल्हा शासकीय रु१/२णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. मयत सुनिल बेरड हे शहापूरचे माजी सरपंच होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, सून, ३ बहिणी असा परिवार आहे. दुपारी उशिरा जिल्हा रु१/२णालयात शवविच्छेदन केल्या नंतर शहापूर येथे मयत बेरड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
भिंगारमधून जाणार्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट ्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. नगरमधील उड्डाणपुलाच्या उद२घाटनाच्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीही मंजूर केला होता. मात्र तरीही रुंदीकरणाचे काम रखडलेले आहे. या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. या रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे भिंगार परिसरात दररोजच वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. याचा येणार्या जाणार्या प्रवाशांना व स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी अनेकदा पत्रव्यवहार केला, आंदोलने केली मात्र राष्ट ्रीय महामार्ग प्राधिकरणकडून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता तातडीने हे काम सुरु झाले नाही तर संभाजी ब्रिगेडसह विविध संघटना नागरिकांसमवेत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अच्युत गाडे यांनी दिला आहे.