नगर शहर व सावेडी उपनगरातून ४० किलो गाजांसह १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांची कारवाई

0
23

नगर – नगर शहर परिसरात गांजा विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर तोफखाना व कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सावेडी उपनगरात तोफखाना पोलिसांनी एकाला पकडून त्याच्या कडून १२ लाख ६३ हजारांचा तर बंगाल चौकीजवळ लेरा ब्रुस मैदानाच्या भिंतीलगत कोतवाली पोलिसांनी दोघांना पकडून ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिघांवर अंमली पदार्थ विक्री प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांना गुरुवारी (दि.१) रात्री गोपनीय माहीती मिळाली की, एका इसमाने सावेडी उपनगरातील भिंगारदिवे मळा, मातोश्री हॉटेल समोर एका घरामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर गांजाचा साठा केलेला आहे. ही माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईसाठी पाठविले. या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन आरोपी अमोल मदन सदाफुले (वय ३४, रा.मानकर गल्ली, भाजीमार्कट शेजारी, दिल्लीगेट, हल्ली रा. दातरंगे मळा, वारुळाचा मारुती जवळ) याला पकडले. त्याच्या ताब्यातून ३४ किलो गांजा, चारचाकी कार, डिजीटल वजनकाटा व दोन बॅग असा एकुण १२ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.त्याच्या विरुद्ध पो.कॉ. सुमीत गवळी यांच्या फिर्यादी वरुन एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पो.नि.आनंद कोकरे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. नितीन रणदिवे, उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पो.हे.कॉ. दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, भानुदास खेडकर, दिनेश मोरे, सुधिर खाडे, अहमद इनामादार, पो.ना. संदिप धामणे, वसीम पठाण, पो. कॉ. सुमीत गवळी, सतीष त्रिभुवन, सतीष भवर, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, बाळासाहेब भापसे यांनी केली आहे. कोतवाली पोलिसांनी दोघांना पकडले दरम्यान कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना बुधवारी (दि. ३१) सायंकाळी बंगाल चौकी जवळ, वृध्देश्वर अर्बन मल्टीस्टेट बँकेसमोर, लेरा ब्रुस मैदानाच्या भिंतीलगत दोन व्येी गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अंमलदार तनवीर शेख, शाहीद शेख, अविनाश वाकचौरे, शिवाजी मोरे, अतुल काजळे, सोमनाथ केकान, तान्हाजी पवार, महेश पवार, दीकप रोहकले, सत्यम शिंदे, अभय कदम, सुरज कदम, प्रमोद लहारे यांच्या पथकाला पंचासमक्ष छापा टाकण्याचे आदेश दिले. पथकाने सायंकाळी सदर ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. कोंडीराम बाबुराव नवले (वय ४२, रा. देवीनिमगाव ता. आष्टी, जि. बीड) व वैभव अनिल घोरपडे (वय १९, रा. बुरूडगल्ली, नगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे साडेसहा किलो गांजा, रोकड, मोबाईल असा ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.