कमी पैशात महागडा मोबाईल देण्याच्या बहाण्याने युवकाची सुमारे ३ लाखांची ऑनलाईन फसवणूक

0
53

नगर – कमी पैशात महागडा मोबाईल देण्याच्या नावाखाली एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची तीन लाख रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना बुर्‍हाणनगर (ता. नगर) येथे घडली. फसवणूक झालेल्या अल्पवयीन मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून एका मोबाईल नंबर धारक अज्ञात व्येी विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगा मुळचा उत्तरप्रदेश राज्यातील राहणारा असून तो सध्या बुर्‍हाणनगर गावात राहत आहे. त्याला ३ डिसेंबर २०२३ ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी एका मोबाईल नंबरवरील अज्ञात व्येीने वारंवार फोन केले. ‘तुम्हाला कमी पैशात महागडा मोबाईल देतो’ असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. वेगवेगळ्या बँक खात्यात पैशाची मागणी केली. फिर्यादीने ३ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान तीन लाख रूपये पाठविले. फिर्यादी यांना त्या व्येीने आजपयरत कुठलाही मोबाईल न देता विश्वासघात करून तीन लाख रूपये घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस अंमलदार ए. एन. नगरे करीत आहेत.