‘झोपडपट्ट्या घोषीत’ करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू

0
151

रामवाडी, कोठला, गोकुळवाडी, कौलारुतील नागरिकांना मिळणार घरे

नगर – शहरातील रामवाडी, कोठला, गोकुळवाडी, कौलारू या झोपडपट२ट्या घोषित करण्यासंबंधी प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या असून येथील नागरिकांना लवकरच ह क्काचे घर मिळणार असल्याची माहिती मांजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांनी दिली आहे. शहरातील रामवाडीसह कोठला, गोकुळवाडी, कौलारू इत्यादी झोपडपट२ट्या या अघोषित झोपडपट२ट्या माहिती भाजी नगरसेवक साहेब ८५०) शिवे दिल्ली आहे नागरिकांना केंद्र सरकारमार्फत सार्वजनिक परिसर (अनधिकृत भोगवटदार निष्कासन) अधिनियम १९७१ च्या कलमान्वये ५अ च्या उपकलम (२) अंतर्गत २६/०५/२०२३ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. त्या अनुषंगाने रामवाडीसह वरील ३ झोपडपट२ट्यांमधील नागरिक माजी आ. दादा कळमकरसह माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांच्या नेतृत्वाखाली २६/०६/२०२३ रोजी जिल्हाधिकारी यांची मोर्चाने भेट घेतली असता भेटी दरम्यान आलेल्या नोटीसीचा खुलासा करत सदर झोपडपट्टी ७० ते ८० वर्षापासून अस्तित्वात असून शासनाच्या नियमानुसार ती घोषित करुन त्यांना ह क्काचा निवारा मिळावा याबाबत चर्चा केली. त्या चर्चेस अनुसरुन जिल्हाधिकारी यांनी २७/१०/२०२३ रोजी अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, छावणी परिषद यांचेशी पत्रव्यवहार केला. सदर पत्रव्यवहाराअंती मुख्य कार्यकारी अधिकारी छावणी, भिंगार यांच्या मार्फत कळविण्यात आले की, सदरचा विषय हा रक्षा संपदा विभाग, पुणे यांचेशी संल३/४ असून पुढील कार्यवाहीसाठी रक्षा संपदा विभाग, पुणे यांचेशी संपर्क साधावा. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय यांचेमार्फत पुणे छावणी परिषद, छावणी विभाग यांचेशी संपर्क करुन झोपडपट२ट्या घोषित करण्याच्या उद्देशाने संबंधितांना सूचित करण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्र माजी नगरसेवक उडाणशिवे यांना जिल्हाधिकारी कार्यालयामधून प्राप्त झाले आहे. गेले ७०-८० वर्षापासून रामवाडी झोपडपट्टीसह गोकुळवाडी, कौलारू, कोठला या शहरामध्ये अस्तित्वात आहेत.

या भागात १० ते १२ हजार लोकसंख्या असून लोक रहात आहेत. सन १९७१, २००१ आणि २००७ या वर्षामध्ये सदरच्या झोपडपट२ट्या स्थानिक स्तरावर नगरपालिका असताना तसेच महानगरपालिकेमध्ये घोषित करुन तो प्रस्ताव वेळोवेळी शासनास पाठविलेला आहे. दलित निधी, घरकुल योजना राबविण्याकरिता झोपडपट२ट्या घोषित असणे अनिवार्य आहे. त्या उद्देशाने पुढील कार्यवाही करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना भेटणार्‍या मोर्चामध्ये माजी नगरसेवक आसाराम कावरे, सुदाम भोसले, विकास उडाणशिवे, सोमनाथ लोखंडे, विकास घाडगे, सकावत पठाण, साजिद काझी, कलावतीबाई बोरुडे, विमलबाई मंडलिक, अलकाबाई काळुंखे यांच्यासह शेकडो रहिवासी यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी यांनी झोपडपट२ट्या घोषित संबंधीची जी प्रक्रिया राबविली आहे, त्यामुळे रामवाडीसह गोकुळवाडी, कौलारु व कोठला येथील रहिवाशांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांना आपल्याला ह क्काचे घर मिळेल, रहात असलेल्या जागेचा ह क्क मिळेल त्यामुळे झोपडपट२ट्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.