सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचा वकील संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा

0
30

नगर- शहर वकील संघटनेच्या नेतृत्वाखाली वकिल संरक्षण कायदा त्वरित लागू व्हावा या मागणीसाठी शहरातील सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाज बंद ठेवत जिल्हा न्यायालयाबाहेर तीव्र धरणे आंदोलन सुरु केले आहे. एक वकील लाख वकील…, वकिल संरक्षण कायदा त्वरित लागू झालाच पाहिजे…. अशा घोषणा आंदोलनकर्ते वकील देत आहेत. आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. शहरातील विविध संघटना, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आंदोलन स्थळी येवून वकिलांच्या आंदोलनास पाठींबा देत आहेत. वकिलांवर सातत्याने होणार्‍या हल्ल२यांच्या निषेधार्थ वकील आपल्या तीव्र भावना व्ये करत आहेत. वकिलांच्या धरणे आंदोलनाचा परिणाम न्यायालयीन कामकाजावर झाला आहे. आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजात वकील सहभाग घेत नसल्याने जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत शुकशुकाट आहे.

धरणे आंदोलनात वकील संघटनेचे सचिव अ‍ॅड. संदीप शेळके, उपाध्यक्ष अ‍ॅड.महेश शेडाळे, महिला सहसचिव अ‍ॅड.भेी शिरसाठ, खजिनदार अ‍ॅड. शिवाजी शिरसाठ, सह सचिव अ‍ॅड. संजय सुंबे, कार्यकारणी सदस्य अ‍ॅड.अमोल अकोलकर, अ‍ॅड. सारस क्षेत्रे, अ‍ॅड.विनोद रणसिंग, अ‍ॅड.देवदत्त शहाणे, अ‍ॅड.शिवाजी शिंदे, अ‍ॅड. रामेश्वर कराळे, अ‍ॅड.अस्मिता उदावंत, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड.अनुराधा येवले, विशेष सरकारी वकील अ‍ॅड.सुरेश लगड, अ‍ॅड.विक्रम वाडेकर, अ‍ॅड.अनिल सरोदे, अ‍ॅड.संजय पाटील, अ‍ॅड.गौरव दांगट, अ‍ॅड.चंदन बारट क्के, अ‍ॅड. सतीश गुगळे, ज्ञानेश्वर फटांगरे, लक्ष्मण कचरे, शिवाजी सांगळे, भगवान कुंभकर्ण, राजेश कातोरे, पी.डी.शहाणे, अशोक बार्शीकर, शाम असावा, रवींद्र रणसिंग, आनंद सूर्यवंशी, गणेश कारे, अजिंय काळे, गोरख तांदळे, एम.एम पाटील, अजय गर्जे, गोरख पालवे, संदीप पठाडे, अ‍ॅड.चौधरी, प्रज्ञा उजगरे, प्रणाली भुयार, गौरी सामलेटी, कृष्णा झावरे, हनीफ जहागीरदार, महेश काळे, संदिप पाखरे, सुहास टोणे आदींसह वकील सहभागी झाले आहेत.