नगर – राज्यातील खासगी अनुदानित शाळांतील डीएड किंवा बीएड अर्हताधारक शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी लागू करावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे. इंग्रजी माध्यमांच्या आकर्षणामुळे मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्याथ्यारची संख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांचे अतिरिे होण्याचे प्रमाण वाढले आहे. अतिरिे शिक्षक नवीन शाळेत रुजू झाल्यानंतर मूळ शाळेतील सेवा ज्येष्ठता डावलली जाते. परिणामी नवीन सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळत नाही. तसेच कमी पायाभूत पदे असलेल्या छोट्या अनुदानित शाळेत मुळात… शिक्षकांची संवर्ग संख्या वरिष्ठ वेतनश्रेणीत २० ट क्के पदे उपलब्ध नसतात त्यामुळे तेथील निवडश्रेणी पात्र शिक्षकांना कधीच निवड श्रेणी अनुज्ञेय होत नाही.
राज्यातील सर्वच विभागातील कर्मचार्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो; परंतु शिक्षकांना तो मिळत नाही. म्हणूनच अर्हताधारक शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी लागू करावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने केल्याची माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली. राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तांत्रिक शाळा, अध्यापक विद्यालय यामधील शिक्षक आणि शिक्षकेतरांना चट्टोपाध्याय वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीवर आधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी प्राप्त करण्यासाठी अट क्र. ३ (क) नुसार निवड श्रेणी ही त्या त्या संस्थेतील व संवर्गातील वरिष्ठ वेतनश्रेणीतील २०% पदांनाच अनुज्ञेय आहे. तसेच त्या संवर्गातील किमान पाच पदे असणार्या प्रवर्गाचाच निवड श्रेणीसाठी विचार करण्यात येतो ही बाब अन्यायकारक असल्याचे सुनील गाडगे म्हणाले.
राज्यातील खासगी अनुदानित शाळांतील डीएड किंवा बीएड अर्हताधारक शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी लागू करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ. आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे, सोनाली अकोलकर, विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी दिला आहे.