अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे : उर्मिला पवार

0
28

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांना रेडियम रिफ्लेटर लावण्याचा उपक्रम

नगर – रस्त्यावर येताना वाहन चालकांनी आपल्यासह इतरांची काळजी घ्यावी. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास मोठ्या प्रमाणात अपघात कमी होणार आहे. मोठ्या प्रमाणात अपघातामध्ये अनेकांचे जीव जात असून, कर्तव्य म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन झाले पाहिजे. दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट व कार चालवताना सीटबेल्टचा वापर तसेच इतर नियमांचे पालन करण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी आवाहन केले. रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने व शेख समीर नजीर यांच्या वतीने उपप्रदेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात वाहनांना रिफ्लेटर रेडियम लावताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, शेख समीर नजीर, सहाय्यक परिवहन अधिकारी संदीप खडसे, इन्स्पेटर मोटर वाहन निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक कल्पेश सूर्यवंशी, संकेत मारवाडी, चेतन दासनुर, वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप, अन्सार शेख, अनिकेत काळे, अकिब शेख उपस्थित होते.रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयी जागृती केली.