मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
38

विद्येची किंमत

एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली, तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले, “तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का ? बारा वर्षे तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे.” शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले ते म्हणाले, “त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणे किमतीचा आहे.” शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला म्हणाला, “पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन.” रामकृष्णांनी पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले, ‘’नावाडी सुद्धा दोन आण्यात पैलतिराला नेतो. त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे. त्या विद्येचा लोकांना उपयोग होत. नाही तिची किंमत शून्य आहे.” तात्पर्य ः माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा.