नगर शहरातील वकिलांच्या धरणे आंदोलनास नगर शहर भाजपाचा पाठिंबा

0
9

वकिल संरक्षण कायद्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करु : अ‍ॅड.अभय आगरकर

वकिल संरक्षण कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी नगर शहरातील वकिलांनी धरणे आंदोलन सुरु केले असून, त्या आंदोलनास शहर जिल्हा भाजपाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी अ‍ॅड.अभय आगरकर आदिंसह पदाधिकारी.

नगर – वकिल संरक्षण कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी नगर शहरातील वकिलांनी धरणे आंदोलन सुरु केले असून, त्या आंदोलनास शहर जिल्हा भाजपाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी अ‍ॅड.अभय आगरकर, वसंत लोढा, प्रा.भानुदास बेरड, सचिन पारखी, अ‍ॅड.युवराज पोटे, प्रशांत मुथा, भैय्या गंधे, गोपाल वर्मा, नितीन शेलार, दत्ता गाडळकर, नरेश चव्हाण, संजय ढोणे, हेमंत कोहळे, प्रिया जानवे, बाळासाहेब गायकवाड, अ‍ॅड.चंदन बारटक्के, अ‍ॅड.साकाला, अ‍ॅड.गाडेकर, बाबासाहेब सानप, अ‍ॅड.विवेक नाईक, अ‍ॅड.दरेकर, हर्षल जोशी, बंटी ढापसे, ऋषीकेश आंबाडे, स्वप्नील बेद्रे, नितीन जोशी, श्रीकांत फंड, पंडित वाघमारे, अमित गांधी, ज्ञानेश्वर धिरडे, राज शेलार, तुषार पोटे, गोकूळ काळे, अ‍ॅड. पाटील, सतीश शिंदे, बाळासाहेब खताडे, मयुर बोचुघोळ आदि उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, राहुरी येथील वकिल दांपत्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे, ही घटना दुर्दैवी आहे. गेल्या काही दिवसांपासून वकिलांवर हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वकिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. वकिलांना आपले कामकाज करतांना सुरक्षितता गरजेची आहे. त्यासाठी राज्य शासनाने वकिल संरक्षण कायदा लागू करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. याबाबत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरिष महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत माहिती दिली आहे. शासन वकिल संरक्षण कायद्याबाबत सकारात्मक आहे. हा कायदा संमत करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करु. तसेच सदर घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. याप्रसंगी वसंत लोढा, प्रा.भानुदास बेरड, बाबासाहेब सानप आदिंनी आपले मनोगत व्यक्त करुन, धरणे आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. तसेच आरोपींना कठोर शासन व्हावे व वकिल संरक्षण कायदा व्हावा, अशीही मागणी केली.