छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांना पुन्हा मुदतवाढ

0
8

नगर – कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणेच दीर्घकाळ रेंगाळलेल्या आहेत.निवडणुका लांबल्याने छावणी परिषदांवर संरक्षण मंत्रालयाने थेट उपाध्यक्ष नियुक्त केले आहेत. निवडणुका वारंवार लांबत असल्याने त्यांना मुदतवाढ मिळत आहे. भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांना पुन्हा एकदा १ वर्षासाठी मुदतवाढ मिळाली आहे. ही त्यांची ६ वी मुदत वाढ आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवल्या आहेत. त्याचा भाजपच्या अनेक नेत्यांना लाभ झाला आहे. यामध्ये भिंगारचे वसंत राठोड यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाने केंद्रीय सरकार छावणी अधिनियम २००६ अन्वये येत्या १० फेब्रुवारीला मुदत संपुष्टात येणार्‍या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षांना पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ साधारणपणे एक वर्षासाठी आहेत. मात्र नव्या निवडणुका होऊन लोकनियुक्त सदस्य कार्यभार स्वीकारत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारची मुदतवाढ देण्याचा प्रघात आहे.