नगर – रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरीत्या फिरणार्या तिघांना भिंगार कॅम्प पोलिसांच्या रात्र गस्त पथकाने पकडले. सनी बबन फुलारे (वय २२), राजु बबन जाधव (वय २४) व सचिन बापू उमाप (वय २०, तिघे रा. भगवान बाबा मंदिराजवळ, सारसनगर) अशी पकडलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक गलोल जप्त करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार कैलास दत्तु शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. ३०) पहाटे नगर- सोलापूर रस्त्यावरील दरेवाडी (ता. नगर) शिवारात टॅक म्युझियम जवळ ही कारवाई करण्यात आली.