हॉटेल व्यवस्थापकाकडून मालकाची फसवणूक;१ लाख ६० हजारांचा अपहार करत झाला पसार

0
14

नगर- नगर शहरातील तारकपूर परिसरातील हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करणार्‍या एकाने हॉटेल मधील ग्राहकांकडून आलेले १ लाख ६० हजार ७६१ रुपये युपीआय आय डी द्वारे परस्पर स्वताच्या बँक खात्यात जमा करून त्या पैशांचा अपहार करत पसार झाला आहे. याप्रकरणी हॉटेल मालकाच्या फिर्यादीवरून संबंधित व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नगरच्या तारकपूर परिसरातील हॉटेल सुवर्णम प्राईड व सुवर्णम रेसिडेंशी चे महेश नवनाथ धुमाळ यांनी याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांच्या हॉटेलमध्ये कुणाल रामदास वाघ (रा. पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक) हा व्यवस्थापक म्हणून कामाला असताना त्याने दि.१ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत हॉटेलमधील ग्राहकांचे आलेले १ लाख ६० हजार ७६१ रुपये युपीआय आय डी द्वारे परस्पर स्वताच्या बँक खात्यात जमा करून त्या पैशांचा अपहार करत पसार झाला. त्याचा शोध घेवूनही तो मिळून न आल्याने तसेच त्याचा मोबाईलही बंद असल्यानेधुमाळ यांनी मंगळवारी (दि.३०) रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी कुणाल रामदास वाघ याच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.