औषधी तुरटीचे फायदे

0
93

औषधी तुरटीचे फायदे

दररोज सकाळ-संध्याकाळ गरम पाण्यात तुरटी फिरवा व त्या पाण्याने चूळ भरा. असं नियमित केल्यामुळे दातांची कीड नाहीशी होऊन मुख दुर्गंधीचा त्रासही नाहीसा होतो. खूप घाम येणार्‍या व्यक्तींनी अंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी व त्या पाण्याने अंघोळ करावी. यामुळे घाम येण्याचं प्रमाण कमी होतं. जखम झाल्यास व त्यातून रक्त येत असल्यास जखम तुरटीच्या पाण्याने स्वच्छ करा. दात दुखत असल्यास तुरटी आणि काळे मिरे एकत्र करून दातांच्या मुळाशी चोळावे, यामुळे दातदुखी थांबते.