‘भिंगार अर्बन’च्या निवडणुकीत ‘भृंगऋषी’चे निर्विवाद ‘वर्चस्व’

0
8

सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय, विरोधी श्री बेलेश्वर पॅनेलसह अपक्ष उमेदवारही पराभूत

भिंगार अर्बन बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेले भृंगऋषी पॅनेलचे उमेदवार

नगर – भिंगार अर्बन को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सत्ताधारी भृंगऋषी पॅनेलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तर सत्तापरिवर्तनासाठी मोठ्या ताकदीने मैदानात उतरलेल्या श्री बेलेश्वर पॅनेलला मात्र या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भिंगार अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी रविवारी (दि. २८) शांततेत मतदान पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. २९) सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर झाला असून, अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत विद्यमान चेअरमन अनिल झोडगे व किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भृंगऋषी पॅनेलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकत बँकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. तर श्रीमती शारदाताई झोडगे व संदेश (पिंटू) झोडगे यांच्या नेतृत्वाखालील श्री बेलेश्वर पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करणार्‍या दोन्ही उमेदवारांचाही पराभव झाला आहे. निवडणूक निकाल जाहीर होताच विजयी भृंगऋषी पॅनेलच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून, फटाके फोडून मोठा जल्लोष केला. निवडणुकीत विजयी उमेदवारांना मिळालेली मते ः सर्वसाधारण मतदारसंघ- झोडगे महेश भाऊसाहेब (३३०३), चौधरी किसनराव सखाराम (३१४०), धाडगे अमोल दत्तात्रय (२९४७), गोंधळे माधव (बाळासाहेब) (२९२०), फुलसौंदर विष्णू भानुदास (२९१२), खरपुडे कैलासराव नारायणराव (२८२५), भंडारी रुपेश चंद्रकांत (२८२०), पतके राजेंद्र जगन्नाथ (२७९३), दळवी कैलास माधवराव (२७४७), रासकर कैलास रोहिदास (२६२९), अनुसूचित जाती जमाती- जाधव एकनाथ रतन (३१७४), महिला राखीव- भुजबळ अनिता राजेंद्र (२९४६), करांडे तिलोत्तमा पोपटराव (२५८३), इतर मागासवर्गीय- झोडगे अनिलराव मधुकरराव (३३०१), भटया विमुक्त जातीजमाती- लंगोटे नामदेव सोनाजी (३३७५). पराभूत उमेदवारांना मिळालेली मते ः सर्वसाधारण मतदारसंघ- कडूस रमेश रंगनाथ (११८६), झोडगे संदेश गोपाळराव (१६९६), दळवी श्रीराम अशोक (१३५१), धाडगे गणेश केशव (११४३), धाडगे विठ्ठल कोंडीराम (१३००), पानमळकर संदीप मल्हारी (१२८३), फुलारी प्रकाश देवराम (१४२१), रासकर अनिकेत विजय (११४५), शिंदे बापूसाहेब सखाराम (१३८८), सय्यद मतीन ख्वाजा (८३२), सपकाळ संजयकुमार माधवराव (अपक्ष) (७२७), एकाडे दिपक दत्तात्रय (अपक्ष) (२३४). महिला राखीव- झोडगे शारदा गोपाळराव (२२४२), शिंदे मुक्ताबाई बापूसाहेब (१४५८). अनुसूचित जातीजमाती- छजलानी संजय बाबुराव (१४८१). इतर मागासवर्गीय- झोडगे शुभम सतीश (१३७५). भटया विमुक्त जातीजमाती- मुदळ सुखदेव शामराव (१३९२).