शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष कृष्णपक्ष, उत्तरा २२|०६
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
राशिभविष्य-
मेष : दिवस चांगला जाईल. महत्त्वाच्या कार्यात हितचिंतकांकडून मदत मिळेल. वाहन
चिंता सतावेल. आरोग्य उत्तम राहिल. सामाजिक कार्यामध्ये यशस्वी व्हाल. आपल्या प्रयत्नाने
उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. राहिलेली कामे पूर्ण होतील.
वृषभ : जुने मित्र भेटतील. हितशत्रुंपासून सावधान. वाहने सावकाश चालवावीत.
कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम
राहील.
मिथुन: व्यावसायिक अडचणी सतावतील. पितृचिंता जाणवेल. वैवाहिक सुख
वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे.
व्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोगमिळेल. देवाण-घेवाणीत त्रास.
कर्क : कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण
मधुर राहील. मानसन्मानात वाढ होईल. आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवावे.
सिंह: धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान
वाढेल. वडीलधार्यांचा आदर करावा. व्यापार व नोकरीच्या दृष्टीने चांगला दिवस.
कन्या: राजकीय व्यक्तींसाठी स्थितीसंतोषदायक राहील. भातृचिंता सतावेल.
वाहनपिडेचा संभव आहे. जुन्या-जाणत्यांचाअनुभव कामी येईल. जास्त सहयोग मिळेल.
कार्यकुशलतेचा लाभ मिळेल.
तूळ : पितृचिंता सतावेल. न्यायसंबंधीविषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये
यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापारय्व्यवसाय सुरळीत राहील.
वृश्चिक: दिवस आनंदात जाईल.मानसन्मानात वाढ होईल. आपल्या क्रोधावर
संयम ठेवा आणि सहकार्यांबरोबर वादाचीस्थिती टाळा. कौटुंबिक वातावरण अत्यंत
उत्तम राहिल. आत्मस्तुतीपासून लांबच रहाणे चांगले.
धनु: पूर्वीपासून आपल्या मनातील असलेले संकल्प पूर्ण होतील. पुर्वी केलेल्या
श्रमांचे फळ आज मिळेल. मात्र विवेक सदैव जागृत ठेवावा. थोरा-मोठ्यांचा आदर करावा.
हितशत्रुंपासून सावधान. अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्यांसाठी शुभ.
गैरसमज दूर होतील.
मकर: आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. कार्य योग्य वेळी पूर्ण
करण्यासाठी कठोर श्रम करावे लागतील. आजचा दिवस जोमदार ठरेल. भावांचे सहकार्य
लाभेल.
कुंभ : आपला विधायक दृष्टीकोन इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो.
राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील. नवीन वास्तू व वाहन घेण्यासाठी उत्तम
दिवस राहिल. मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ
लाभेल.
मीन : आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. राजकीय व्यक्तींसाठी
स्थिती संतोषदायक राहील. भातृचिंता सतावेल. आजचा दिवस चांगला आहे. व्यापार
व्यवसायात अनुकूल वातावरण राहील.
संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.