गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीस पकडले

0
70

गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणार्‍या आरोपीस पकडल्यावर त्याच्या समवेत एमआयडीसीचे स.पो.नि.माणिक चौधरी व पथक.

नगर – एमआयडीसी हद्दीतील शेंडी (ता.नगर) परीसरातुन विनापरवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणार्‍या आरोपीस जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. संदिप दिलीप भालेराव (रा. खोसपुरी ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे. प्रजासत्ताक दिनी शुक्रवारी (दि. २६) एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.माणिक चौधरी यांना गोपनिय माहिती मिळाली की शेंडी बायपास चौक येथे एक इसम बेकायदेशिरपणे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस बाळगत फिरत आहे. त्यावरुन स.पो.नि.चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन आरोपी संदिप दिलीप भालेराव (रा. खोसपुरी ता. नगर) यास शेंडी बायपास चौक शेंडी शिवार येथे सापळा लावुन पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कटटा व एक जिवंत काडतुस असा एकुण २६ हजार रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन त्याच्या विरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पो.कॉ. किशोर जाधव यांच्या फिर्यादीवरुन भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स.पो.नि.माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे.कॉ. नंदकिशोर सांगळे, रमेश थोरवे, राजु सूद्रिक, पो.ना. विष्णु भागवत, पो.कॉ. किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, भगवान वंजारी, सचिन हरदास, उमेश शेरकर, मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांनी केली आहे.