मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने आ संग्राम जगताप यांचा आनंदोत्सव

0
17

राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढल्यावर नगरमध्ये जल्लोष करताना आ.संग्राम  जगताप व कार्यकत

नगर – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे गेल्या पाच महिन्यापासून लढत होते त्याला यश येत राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला आहे, यासाठी मी मनोज जरांगे आणि राज्य सरकारचे अभिनंदन करतो, या आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील गरजवंतांना नक्कीच होईल असे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले, राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला असून त्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आनंदोत्सव साजरा केला आहे, यावेळी पेढे वाटप करत फटायांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी चंद्रकांत गाडे, प्रा, माणिकराव विधाते, कुमारसिंह वाकळे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, अजिंय बोरकर, प्रकाश भागानगरे, गुड्डू खताळ, सुरेश बनसोडे, संतोष ढाकणे, सचिन जगताप, सागर गुंजाळ यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते