बंद पथदिवे तातडीने सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार

0
31

रस्त्यावरील पथदिवे तातडीने सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनपा अति. आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना देण्यात आले.

रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत, ते तातडीने दुरुस्त करुन सुरु करण्यात यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनपा अति.आयुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना देण्यात आले. याप्रसंगी सावेडी विभाग अध्यक्ष किरण प्रशांत रोकडे, नितीन जायभाय, स्वप्निल वारे, मयुर मतकर, दिपक नासाने, मयूर साठे, अमोल गोरे, गणेश भुजबळ आदि उपस्थित होते. शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावेडी उपनगरातील प्रभाग क्र.६ मधील उदय अपार्टमेंट, अक्षय अपार्टमेंट, कांचनगंगा अपार्टमेंट, अंबर अपार्टमेंट समोरील रस्त्यावरील पथदिवे खूप दिवसांपासून हे बंद आहे व काही खांबावर पथदिवे नाही. त्यामुळे त्या रोडवर रात्रीच्या वेळेस खूप अंधार असतो. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तेथील वळणाचा रोड असल्यामुळे लाईट नसल्यास अपघात होण्याची देखील शयता नाकारता येत नाही. सदर विषयाची माहिती घेऊन लवकरात लवकर तेथील पथदिवे बसवावे. ८ दिवसात कार्यवाही झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.